ENG VS PAK: इंग्लंडने चेंडूला लकाकी देण्यासाठी शोधला नवा प्रकार; दृश्य बघून मैदानात पिकला हशा
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान एक मजेशीर किस्सा घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Image Credit-Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेंडूला स्विंग मिळण्यासाठी त्याची एक बाजू चांगली ठेवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूकडून सातत्याने सुरू असतो. (Image Credit-Social Media)
यासाठी ते एक चेंडूची बाजू सतत पेंटला घासत असतात. कोरोनाच्या आधी चेंडूला थुंकी लावून तो घासला जायचा. (Image Credit-Social Media)
आयसीसीकडून थुंकी लावण्यावर बंदी आल्यानंतर आता घामाचा वापर केला जातो. (Image Credit-Social Media)
पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या ज्यो रूटने चेंडूला लकाकी देण्यासाठी एक नवा प्रकार शोधून काढला. (Image Credit-Social Media)
इंग्लंड क्रिकेट संघाचा फिरकीपटू जॅक लिचचे टक्कल पडले आहे. (Image Credit-Social Media)
त्यामुळे जो रूटने त्याच्या डोक्यावर आलेला घाम चेंडूला लावत तो घासण्याचा प्रयत्न केला. सदर दृश्य बघून मैदानात हशा पिकला होता. (Image Credit-Social Media)
जॅक लिचसुद्धा जोरजोरात हसायला लागला. सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.(Image Credit-Social Media)