Diwali 2024: दिवाळीत 'या' गोष्टी दिसणं शुभ!
Diwali 2024: सगळ्यांनाच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असतो. आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो आणि काही गोष्टी दिसल्या तर समजा देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे.

Diwali 2024
1/5
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यांनाच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असतो. आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. आणि अशावेळी काही गोष्टी दिसल्या तर समजा देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे.
2/5
यंदा दिवाळी 31 ऑक्टोबरपासून सुरु होतेय.खरंतर दिवाळीचे सगळेच दिवस शुभ असतात आणि अशा वेळी समजा तुम्हाला काही चांगल्या गोष्टी दिसल्या तर ते शुभ मानलं जात. दिवाळीच्या दिवसांत समजा तुम्हाला पाल दिसली तर ते शुभ मानलं जातं. पाल दिसणं म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या काळात पैशांची कमी नसणार याचा संकेत आहे.
3/5
त्याचबरोबर उंदीर दिसला तर तोही शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवसात उंदीर दिसणे म्हणजे देवी लक्ष्मी चक्क तुम्हाला आशीर्वाद दयायला आली आहे.
4/5
दिवाळीच्या दिवशी समजा घुबडाचे दर्शन होत असेल तर शुभ मानले जाते घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे. दिवाळीमध्ये रात्री घुबड दिसले म्हणजे देवी लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे असा संकेत असतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत जर तुम्हाला पाल,उंदीर आणि घुबडाचं दर्शन होत असेल तर समजा तुम्ही लवकरच धनवान होणार आहात.
5/5
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 24 Oct 2024 12:05 PM (IST)