Diwali 2024 : दिवाळीत चुकूनही कुणाला देऊ नका 'या' भेटवस्तू; ओढावेल आर्थिक संकट, लक्ष्मी होईल नाराज
दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. अशा भेटवस्तू काय द्याव्या हे सूचत नाही आणि आपण कोणत्याही वस्तू मित्र-परिवाराला देऊ करतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु काही गोष्टी अशा असतात ज्या दिवाळीत भेटवस्तू म्हणून दिल्याने तुमची संपत्ती वाढण्याऐवजी घटत जाते. आर्थिक संकट ओढवतं. त्यामुळे या काळात कोणत्या भेटवस्तू देणं टाळावं? जाणून घेऊया.
घड्याळ - दिवाळीनिमित्त कोणालाही घड्याळ भेट देऊ नका. घड्याळ हे वेळ निघून जाण्याचे प्रतीक आहे, जे दर्शवतं की आयुष्याचा काळ कसा कमी होत चालला आहे.
दिवाळीत घड्याळ भेट दिल्याने नकारात्मकता हस्तांतरित होते, जी ना तुमच्यासाठी चांगली असते, ना ज्याला तुम्ही भेट देताय त्याच्यासाठी.
काळे कपडे - दिवाळीत काळ्या रंगाच्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी या विशेष प्रसंगी काळे कपडे घालू नयेत किंवा काळे कपडे कोणाला भेट म्हणूनही देऊ नयेत.
कोणतीही तीक्ष्ण वस्तू - दिवाळीत कुणालाही चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नयेत.
सोन्या-चांदीची नाणी - साधारण दिवशी सोने-चांदीची नाणी भेट देण्यास हरकत नाही. परंतु, दिवाळीच्या निमित्ताने सोन्या-चांदीची नाणी भेट देणं टाळावं. असं केल्याने तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देत आहात, असं मानलं जातं.
तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना कपडे, मिठाई, सुका मेवा इत्यादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या दिवशी लिंबू, लोणचे इत्यादी आंबट पदार्थ खरेदी करू नयेत, यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.
तसेच दिवाळीपूर्वी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका आणि 15 दिवस काळे कपडे न घालण्याचा प्रयत्न करा, यामुळे नकारात्मक परिणाम वाढतो.