Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chanakya Niti : प्रत्येक मनुष्यात असाव्यात श्वानाच्या 'या' 6 सवयी; सुखी जीवनासाठी चाणक्य सांगतात...
चाणक्य म्हणतात, श्वान फार संवेदनशील असतात. ते आपल्या मालकांच्या भावनांना लवकर समजून घेतात. हा स्वभाव मनुष्याने देखील आत्मसात करणं गरजेचं आहे. मनुष्याने देखील दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण पाहिलं असेल की श्वान हे प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी आणि ती समजून घेण्यासाठी फार उत्सुक असतात. जोपर्यंत ते त्या ठराविक गोष्टीबाबत पूर्णपणे शिकत नाहीत तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याकडे देखील ही जिज्ञासू वृत्ती असावी.
श्वान आपल्या मालकाप्रती फार प्रामाणिक असतो. ते आपल्या मालकाप्रती आपले प्राणही देऊ शकतात. चाणक्य म्हणतात, मनुष्याने सुद्धा ही सवय जोपासली पाहिजे. मनुष्याने सुद्धा आयुष्यात आपलं काम आणि नात्याविषयी प्रामाणिक असणं गरजेचं आहे.
चाणक्यांच्या मते, श्वान हे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत आनंदी आणि खुश असतात. ते घरी आलेल्या पाहुण्यांना पाहून खुश होतात. त्याचप्रमाणे, मनुष्याने देखील प्रत्येक वेळी येणाऱ्या संकटांचा सामना करुन आयुष्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद मानला पाहिजे.
चाणक्य नितीत सांगितल्याप्रमाणे श्वान हा एक निडर प्राणी आहे. आपल्या मालकावर आलेलं संकट पाहून तो समोर येणाऱ्या कोणत्याही पाहुण्याशी लढतात. ही सवय मनुष्याने देखील आपल्या आचरणात आणली पाहिजे.
आचार्य चाणक्या यांच्या मते श्वान हा फार सतर्कतेने झोपतो. छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा देखील त्याला लगेच आवाज येतो. माणसाने देखील अशीच सतर्कता दाखवावी.
श्वानाचा स्वभाव हा फार संयमी असतो. तो केवळ भूक लागल्यावरच जेवतो. त्याच पद्धतीने मुनष्याने देखील आपल्या आहारात ज्या गोष्टींचा समावेश आहे त्याचं ग्रहण केलं पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)