Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितर नाराज असतील तर घरी घडतात 'या' अशुभ घटना; करा 'हे' सोपे उपाय
Pitru Paksha 2024 : सध्या पितृपक्ष सुरु आहे. अशामध्ये पितरांचं नाराज होणं म्हणजे कुटुंबियांसाठी हे एक चिंतेचं कारण ठरु शकते.
Continues below advertisement
Pitru Paksha 2024
Continues below advertisement
1/9
जर पितर नाराज झाले तर घरात काही अशुभ घटना घडू लागतात. यासाठी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतात.
2/9
जर एखाद्या व्यक्तीने पितरांना रडताना पाहिलं असेल तर ही फार अशुभ घटना मानली जाते. जर तुम्हालाही अशी स्वप्नं पडत असतील तर याचा अर्थ तुमचे पितर तुमच्यावर नाराज आहेत.
3/9
यासाठी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात पितरांच्या नावाने अन्न, जल आणि वस्त्रदान करणं गरजेचं आहे.
4/9
जर पितृ क्रोधित असतील तर घरात होणाऱ्या सर्व शुभ कार्यांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे विघ्न येतं. या कारणामुळे घरात वाद वाढतात. किंवा त्या कामात यश मिळत नाही.
5/9
पूर्वजांची कृपा हवी असल्यास एखाद्या मंदिराच्या प्रांगणात पिंपळाचं झाड लावा आणि नियमितपणे त्या झाडाची पूजा करा.
Continues below advertisement
6/9
जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची चिंता सतावत असेल, झोपेत अचानक भीती वाटत असेल तर हा एका अर्थाने पितृदोष असू शकतो. जर तुम्हाला यापासून मुक्ती हवी असेल तर पितृपक्षात रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावा. तुम्ही वर्षभर हा उपाय करु शकता. तुमचे पितर प्रसन्न होतील.
7/9
पितृदोष शांत करण्यासाठी पाण्यात दूध आणि काळे तीळ मिक्स करुन पिंपळाच्या झाडावर शिंपडावे. यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद राहतात.
8/9
घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावा. तसेच, रोज त्यांच्या फोटोसमोर तुमच्या चुकांची माफी मागा. असं म्हणतात यामुळे पितृदोषाचा प्रभाव फार कमी होतो.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 22 Sep 2024 11:29 AM (IST)