Chanakya Niti : एकवेळ भावंडांना उठवा, पण 'या' 5 लोकांना चुकूनही झोपेतून उठवू नका; बेतेल जीवावर, चाणक्य सांगतात...
आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते, ते नैतिक मूल्यांसाठी ओळखले जातात. सुखी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे ते त्यांच्या नीती शास्त्रातून सांगत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजवर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. चांगल्या-वाईट गोष्टींची ओळख चाणक्य करुन देतात.
चाणक्यांनी अशा 5 लोकांबद्दल सांगितलं आहे, ज्यांना झोपेतून अजिबात उठवू नये, अन्यथा ते तुम्हाला महागात पडू शकतं.
चाणक्यांच्या नितीशास्त्रात हा श्लोक आहे - अहीं नृपं च शार्दुलं बारातिम बल्कन तथ । पार्श्वनाम च मुरोहम् च सप्त सुप्तन्ना बोधियत् । या वाक्यांनुसार...
राजा : चाणक्याच्या मते, प्राचीन काळी राजाला झोपेतून उठवणं हा गुन्हा मानला जात असे. आजच्या काळात जर तुम्ही एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला किंवा राज्यकर्त्याला झोपेतून उठवलं तर तुम्ही त्याच्या क्रोधाला बळी पडू शकता.
मूर्ख : आचार्य चाणक्यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला झोपेतून उठवणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं. जर तुम्ही मूर्ख माणसाला त्याच्या फायद्यासाठी झोपायला लावलं तर तो तुम्हाला दोष देईल.
लहान मूल : मुलांची झोप अपूर्ण झाली तर झोपेतून उठल्यावर त्यांची चिडचिड होते, त्यांना हाताळणं कठीण होतं, म्हणून त्यांना कधीही गाढ झोपेतून उठवू नये. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही असं करणं योग्य नाही.
सिंह : झोपलेल्या सिंहाला उठवण्याची चूक कधीही करू नये, अन्यथा ते प्राणघातक ठरू शकतं. झोपलेल्या सिंहाला उठवलं तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं.
शिकारी प्राणी : जर एखादा बलाढ्य प्राणी झोपला असेल तर त्याला उठवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला त्रास देऊ नका. हिंसक प्राणी रागावून एखाद्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो, यामुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.
चाणक्यांच्या मते, एखाद्या कुत्र्याला झोपेतून उठवणं म्हणजे स्वतःला अडचणीत टाकण्यासारखं आहे, त्यांच्याशी छेडछाड करू नका अन्यथा ते तुम्हाला त्रास देऊ शकतात.