EPF Advance Claim : अवघ्या तीन दिवसांत ईपीएफ खात्यातून काढा एक लाख रुपये, फक्त 'या' स्टेप्स करा फॉलो!
ईपीएफओने आता ॲडव्हान्स क्लेमची लिमिट वाढवलेली आहे. आत ॲडव्हान्स क्लेम अंतर्गत ईपीएफओ खातेदार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो. अगोद ही लिमिट 50 हजार रुपये होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही ही रक्कम ऑटो सेटलमेंटच्या माध्यमातून काढू शकता. विशेष म्हणजे ॲडव्हान्स क्लेमसाठी अर्ज केल्यावर तीन दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होतील.
ॲडव्हान्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला केवायस, क्लेम रिक्वेस्ट तसेच बँक खात्याची माहिती द्यावी लागते.
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला यूएएन आणि पासवर्डचा वापर करावा लागेल. यूएएन आणि ईपीएफओच्या मदतीने तुम्ही ईपीएफओ पोर्टलवर लॉगीन करू शकता.
एकदा लॉगीन केल्यानंतर तुम्ही सर्व्हिसेस सेक्शनम्ये जाऊन क्लेम सेक्शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर बँक खाते व्हेरिफाय करून ऑनलाईन क्लेम वर क्लीक करावे.
त्यानंतर नवे पेज उघडले. नव्या पेजवर तुम्हाला पीएफ ॲडव्हान्स फॉर्म 31 निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या पीएफ खात्यातून रक्कम काढायची आहे, ते खाते निवडावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स क्लेम का करायचा आहे, त्याचे कारण द्यावे लागले. तसेच किती पैसे काढायचे, पत्ता आदी माहिती भरावी. त्यानंतर पासबूक स्कॅन करून त्याची कॉपी तुम्हाला अपलोड करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला आधारच्या माध्यमातून स्वत:चे व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यानंत तुमची क्लेम पोसेस पूर्ण होईल.
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो