Buldhana : सिंदखेड राजा येथे उत्खननादरम्यान सापडलं पुरातन शिवमंदिर; तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर असल्याचा दावा, पाहा फोटो
बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनना दरम्यान एक शिवमंदिर सापडलं आहे, तेराव्या शतकातील हे यादवकालीन मंदिर असल्याचा दावा सध्या करण्यात येतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय पुरातत्व विभागाकडून नुकतीच या मंदिराची पाहणी झाली.
सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं, त्या दरम्यान हे तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर सापडलं.
हे प्राचीन मंदिर सापडल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षकांनी या मंदिराची पाहणी केली.
दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर उत्खनानादरम्यान सापडल्याने अजूनही या परिसरात काही पुरातत्त्व वास्तु सापडण्याची शक्यता आहे.
याच अनुषंगाने या परिसरात आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली उत्खननाचं काम सुरू आहे.
तसेच या सापडलेल्या पुरातत्त्व मंदिराचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचंही भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी सांगितलं.