Astrology : रात्रीच्या वेळी श्वान का रडतात? श्वानाच्या रडण्याचा अर्थ काय? जाणून घ्या...
हिंदू धर्मग्रंथानुसार, श्वानाच्या रडण्या संबंधित वेगवेगळे अर्थ सांगण्यात आले आहेत. बहुतेकदा श्वानाचं रडणं हे अशुभच मानलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधार्मिक मान्यतेनुसार, रात्रीच्या वेळी श्वानाचं रडणं अशुभ मानलं जातं. जर एखादा श्वान रडत असेल तर ते शुभ मानलं जात नाही.
श्वानाचं रडणं हे एखाद्या अशुभ घटनेचा इशारा देतं. रात्रीच्या वेळी श्वानाच्या रडण्याचा अर्थ असा आहे की, लवकरच एखादं मोठं संकट येणार आहे. ज्या घरासमोर श्वान रडतो त्या घरावर लवकरच मोठं संकट येणार आहे अशी यामध्ये मान्यता आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, रात्री श्वानाच्या रडण्याचा अर्थ म्हणजे त्याला त्याच्या आजूबाजूला पूर्व किंवा आत्मा भटकताना दिसतायत.
वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार पाहायचं झाल्यास, श्वान आपलं म्हणणं आपल्या मालकापर्यंत पोहोचवण्यासाठी रडतात. श्वान हे त्यांच्यावर जेव्हा संकट येतं किंवा त्यांना काही मार लागल्यास, दुखल्यास ते रडतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)