Ashadhi Wari 2024 : पाऊले चालती पंढरीची वाट...संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आणि शेकडो मैलांची पायपीट करीत आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेले पालखी सोहळे आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआषाढी वारी पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. राज्यातून ठिकठिकाणांहून पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतायत.
पहाटेपासून निवृत्तीनाथांच्या मंदिरात पूजा विधीला सुरुवात झाली असून वारकरी देखील दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय.
श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते पंढरपूर असे 450 किलोमीटरचे अंतर पायी चालत वारकरी नाथांच्या पालखीत सहभागी होणार आहेत.
20 जून ते 16 जुलै या 27 दिवसांत त्र्यंबकेश्वर येथून निघालेली नाथांची पालखी पंढरपूर येथे आषाढी वारीला पोहोचणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आज निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळतेय.
एकूणच पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.