Winter Vegetable : हिवाळ्यात 'या' फळभाज्यांची लागवड केली जाते, बाजारातही असते यांची भरपूर मागणी..
हिवाळ्यात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केल्यास त्यांना खूप फायदा मिळतो.अर्का विकास, सर्वोदय, निवड-4, समय किंग, अंकुश, टोमॅटो 108, विक्रंक आणि अदिती यासह टोमॅटोच्या अनेक सुधारित जाती आहेत. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिमला मिरची लागवडीला वर्षभर बाजारात मागणी असते. हिवाळ्यात शिमला मिरचीची मागणी वाढते. (Photo Credit : pixabay)
हिवाळ्यात वांग्याची लागवड करणे चांगले आहे. पुसा पर्पल क्लॉन्ग, पूजा क्रांती, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा अनमोल, अन्नामलाई, मुक्तकेशी या वांग्याच्या सुधारित जाती आहेत. (Photo Credit : pixabay)
हिवाळ्यात प्रत्येक पदार्थात आर्वजून दिसणारा घटक म्हणजे मटार होय. वर्षभर वापरण्यासाठी मटारची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. (Photo Credit : pixabay)
हिवाळ्याच्या काळात मुळ्याची वाढ झपाट्याने होते. जपानी व्हाईट, पुसा चेतकी, बॉम्बे रेड, पुसा रेशमी, जौनपुरी, पंजाब एजेटी या मुळ्याच्या सुधारित जाती आहेत. (Photo Credit : pixabay)
स्ट्रॉबेरीची लागवड फक्त हिवाळ्यात केली जाते. ऑफरा, एलिस्टा, स्वीड चार्ली, कॅमरोसा, चांडलर या स्ट्रॉबेरीच्या जाती भारतात उगवल्या जातात. (Photo Credit : pixabay)
हिवाळ्यात आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी पपईची लागवड करतात. पपई आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (Photo Credit : pixabay)
ब्रोकोली या विदेशी भाजीला बाजारात मोठी मागणी आहे. आरोग्यासही त्यांचे खूप फायदे आहेत. एका विशिष्ट पद्धतीने ब्रोकोलीची लागवड केली जाते. (Photo Credit : pixabay)
वालुकामय चिकणमातीचा वापर पिक लागवडीसाठी करावा, यामुळे चांगले उत्पादन मिळते. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)