Agriculture Tips : टोमॅटोच्या चांगल्या वाढीसाठी ही गोष्ट टोमॅटोच्या झाडांमध्ये टाका; चांगले उत्पादन मिळेल
तुम्ही घरी टोमॅटोची लागवड करून पैसे कमावू शकतात. तुम्हला जर घरगुती टोमॅटोची लागवड करायची असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकतात. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजकाल प्रत्येकाला किचन गार्डनिंगची आवड आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळे लावतात. (Photo Credit : Pixabay)
अनेकांना त्यांच्या किचन गार्डनमध्ये टोमॅटो लावायला आवडतात. पण, त्यांना फारसे उत्पादन घेता येत नाही. तुम्हला जर चांगले उत्पादन हवे असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकतात. (Photo Credit : Pixabay)
टोमॅटोच्या रोपांपासून अधिक फळे मिळविण्यासाठी तुम्ही त्यात ह्युमिक अॅसिड आणि सेंद्रिय पोटॅश टाकू शकता.(Photo Credit : Pixabay)
ही दोन्ही खते तुम्हाला कोणत्याही खताच्या दुकानात सहज मिळतील. सेंद्रिय पोटॅश फळांच्या वाढीसाठी उत्तम मानले जाते. (Photo Credit : Pixabay)
याशिवाय ह्युमिक अॅसिड हे झाडांची फुलं गळण्यापासून वाचवते. (Photo Credit : Pixabay)
तसेच तुम्ही पाणी, कडुलिंबाची पेंड, मोहरीची पेंड आणि केळीच्या सालीपासून खत तयार करू शकता.(Photo Credit : Pixabay)
सर्व साहित्य पाण्यात मिसळा आणि 10 दिवस ते तसेच ठेवा. दहा दिवसांनंतर, टोमॅटोच्या रोपांसाठी खत तयार होईल.(Photo Credit : Pixabay)
किचन गार्डनमध्ये लावलेली टोमॅटोची रोपे सूर्यप्रकाशात ठेवावीत. हिवाळ्यात जास्त पाणी देऊ नका आणि माती कोरडी ठेवू नका.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)