Rain : अवकाळीचा द्राक्षाला मोठा फटका
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अवकाळी पावसाचा पंढरपूर (pandharpur) तालुक्यातील द्राक्ष बागांना (grapes crop) मोठा फटका बसला आहे.
पावसामुळं द्राक्षाच्या घडांचं मोठं नुकसान होत आहे. तर दुसरीकडे शेडवर टाकलेला बेदानाही खराब होताना दिसत आहे. तसेचं पुणे जिल्ह्यातील इंदापूर (indapur) तालुक्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
गेले दोन दिवस पंढरपूर परिसरात झालेल्या पावसानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे
कालच्या अवकाळी पावसानं द्राक्षाच्या घडाला क्रॅक पडत आहेत. त्यामुळं हाती आलेले कोट्यवधी रुपयांचे पीक डोळ्यासमोर मातीमोल होऊ लागले आहे.
द्राक्षाला कमी भाव येऊ लागल्यानं शेतकऱ्यांनी द्राक्षांचा बेदाणा करण्यासाठी शेडवर अंथराला असून या पावसाळी वातावरणाने बेदाणा चॉकलेटी पडू लागल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बेदाण्याला 200 रुपयांपर्यंत चढा भाव मिळत होता. पण पावसाने बेदाण्यांचा रंग बदलू लागल्यानं आता बेदाण्याचा भाव थेट 50 रुपयांपर्यंत कोसळला आहे.
आता शासनानं तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत.
पंढरपूर जिल्ह्यातील एकट्या कासेगाव परिसरातील 1500 कोटींची रुपयांची द्राक्षांची उलाढाल होते.