Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी
राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे ढगाळ वातावरण होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे.
सातारा (Satara) जिल्ह्यासह पुणे (Pune), धुळे, वर्धा जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुधवारी रात्री सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपलं.
बुलढाण्यासह परभणीत अवकाळी पावसाच्या सरी. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे.
अमरावती, अकोला वर्धा, धुळे जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.
मुंबईसह ठाण्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.