Ravikant Tupkar : लढाई सुरुच राहणार, कारागृहातून बाहेर येताच रविकांत तुपकरांचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह 25 कार्यकर्त्यांची अकोला जिल्हा कारागृहातून सुटका झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा न्यायालयानं (Buldana) तुपकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला होता. आज सकाळी त्यांची सुटका झाली आहे.
रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या 25 सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयानं (Buldhana Court) कालच दिलासा दिला होता. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला होता.
11 फेब्रुवारीला झालेल्या आंदोलनात तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत होते.
आंदोलनात झालेल्या राड्यानंतर तुपकरांसह 40 वर कार्यकर्त्यांवर दंगलीचे गुन्हे झाले होते दाखल. गुन्हे दाखल झाल्यानंतर तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांची अकोला कारागृहात रवानगी झाली होती.
कापूस सोयाबीनसह पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरुन शनिवारी (11 फेब्रुवारी) स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात संघर्ष देखील झाला होता. त्यानंतर तुपकरांसह 25 सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आत्मदहन आंदोलनाच्या दणक्यानं 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आलं आहे
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी म्हटलं होतं.