Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli : नाफेडकडून हरभरा खरेदी केंद्र सुरु नाहीत; हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील हरभरा (Gram Crop) उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत सापडले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअद्यापही हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या (Nafed) केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरवर्षी हिंगोलीत हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या वतीनं हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जातात. पण अद्याप त्याबाबत हालचाल झालेली दिसत नाही.
सध्या हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हरभरा काढणी सुरु झाली आहे. यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल पाच हजार 300 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र काढणी केलेला हरभरा आता चार हजार 100 रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कमी पाण्यावर येणारं पीक म्हणून हरभरा पिकाला ओळखले जाते. याशिवाय हरभऱ्याची विक्री हमी भावाने होत असल्यानं शेतकरीसुद्धा हरभरा लागवडीला प्राधान्य देत असतात.
यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्याने उत्पादनही चांगले निघत आहे. परंतु उत्पादित हरभरा विकायचा कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे
सध्या हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हरभरा काढणी सुरु झाली आहे. यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल पाच हजार 300 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.
काढणी केलेला हरभरा आता चार हजार 100 रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्यानं उत्पादनही चांगले निघत आहे.
हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या (Nafed) केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी हिंगोलीत हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या वतीनं हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जातात.