Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
भिकेश पाटील
Updated at:
11 Dec 2024 05:30 PM (IST)
1
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एका शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शहादा तालुक्यातील धुरखेडा येथे ही घटना घडली आहे.
3
पाटील आणि परशुराम पाटील यांचा शेतात हा प्रकार घडलाय.
4
ऊस जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्याचे 23 लाख रुपयांचे नुकसान झालंय.
5
विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नुकसान झाल्याच्या आरोप शेतकऱ्यांने केला आहे.
6
कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.
7
शेतकरी म्हणाले, माझा 16 एकर ऊस जळून खाक झालाय.
8
गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या शेतातील ट्रान्सफॉर्मर जीर्ण अवस्थेत होता.
9
शिवाय त्याखालील तारांबाबतही मी संबंधित विद्युत कंपनीला तक्रार दिली होती.
10
मात्र, सदर खात्याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने माझं नुकसान झालंय.