नाद खुळा! 50 ते 55 पेरी असलेला लांबलचक ऊस पिकवला, कोल्हापुरातल्या शेतकऱ्याने 3 एकरात अंदाजे 10 लाख 80 हजार कमावले
Farmer Success Story, कोल्हापूर : बदलत्या हवामानामुळे एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. मात्र कोल्हापूरच्या शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने उसाची शेती केली...आणि प्रतिगुंठा विक्रमी उत्पादन घेतले आहे...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या या शेतकऱ्याची राज्यात चर्चा होत असून त्यांच्या शेतातील लांबलचक ऊस पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.... शेतकऱ्याने 3 एकरात अंदाजे 10 लाख 80 हजार कमावले आहेत.
योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली...तर मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते...हे कोल्हापुरातील लाटवडे गावच्या उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
शंकर पाटील यांचे हातकणंगले तालुक्यातील लाटवडे हे गाव आहे..पाटील कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असूनही त्यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे...त्यामुळेच आजवर त्यांनी द्राक्ष, केळी, पपई अशी प्रयोगशील शेती केली आहे.
पारंपारिक शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक पद्धतीने ऊस शेती केली...विक्रमी उत्पादन घेण्याचा निर्धार करून त्यांनी उसाची लागण केली...
जुलैमध्ये 86032 या जातीची बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची साडेचार फूट सरी सोडून लावण त्यांनी केली... अन् तब्बल 50 ते 55 पेरी असणारा लांबलचक वजनदार ऊस सोळा महिन्यात तयार झाला...
पाटील यांना गुंठ्याला तीन टन उत्पादन घेण्यात यश आले आहे.. जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार ऊस तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागतेय. एकसारखा तीन एकरातील हा ऊस तब्बल ३६० टन उत्पादन देणारा ठरणार आहे.
पाटील यांच्या तीन एकर शेतात हा 50 ते 55 पेरांचा लांबलचक ऊस वाढला आहे... उसाची शेती परवडत नाही अशी तक्रार त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन फोल ठरविली.
शेतीचे योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन केले की भरघोस उत्पादन मिळते अन् आर्थिक फायद्याचा गोडवा ही चाखता येतो हे शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे...