Sugarcane Juice : आता ऊसाच्या रसावर 12 टक्क्यांचा GST
उन्हाळ्यात सर्वांच्या आवडीचं पेय म्हणजे ऊसाचा रस (Sugarcane juice). मात्र, आता याच ऊसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी (GST) भरावा लागणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने (authority for advance ruling uttar pradesh) याबाबतचा निर्णय दिला आहे.
ता ऊसाचा महाग होणार आहे. मात्र, तुम्ही जर रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेतला तर त्यासाठी हा GST द्यावा लागणार नाही.
ऊसाचा रस हा कृषी उत्पादनात मोडत नाही. त्यामुळं जीएसटीसाठी तो पात्र ठरतो असे उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीनं सांगितले आहे.
या निर्णयानंतर रस्त्यावरील गाड्यावरील ऊसाच्या रसावर जीएसटी असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
ऊसाचा रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याच्या बिलात जीएसटी अंतर्भाव होऊ शकतो.
महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं राज्यात साखर आणि गुळाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं. असे असले तरी ऊसाचा रसही काढला जातो.
उसाचा रस हे कृषी उत्पादन नाही. त्यामुळं ऊसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे.
व्यापारी तत्वावर जर ऊसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावर हा जीएसटी द्यावाच लागेल, असे उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने म्हटले आहे. ऊसाचा रस हा कृषी उत्पनात मोडत नाही.
उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्स या कारखान्याने ऊसाचा रस व्यापारी तत्त्वावर विकण्याचे नियोजन केले होते. त्यामुळं या रसावर जीएसटी लागू होईल का, याची अधिक माहिती घेण्यासाठी जीएसटी ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीकडे संपर्क केला.