Chia Farming : चार मित्रांनी यू ट्यूबवरुन धडे घेतले, अकोल्यात चिया पिकाचं यशस्वी प्रयोग
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात एका नव्या पीक पद्धतीचा प्रयोग होत आहे. हा प्रयोग आहे 'चिया' शेतीचा... चिया या पिकाच्या बिया फालूदा आणि इतर पेयांमध्ये वापरल्या जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबार्शीटाकळी तालुक्यातील मोरळ, भेंडी गाजी, बैरखेड अन् पिंजर येथील शेतकऱ्यांनी ही शेती केली आहे.
चार शेतकरी मित्रांनी यूट्यूबवरुन धडे घेत एकमेकांच्या सहकार्याने ही 'चिया' शेती केली आहे.
अमेरिकेतील मेक्सिको प्रांतात प्रामुख्यानं या पिकाची शेती केली जातेय. चिया या पिकाच्या बिया वापरल्या जातात फालूदा आणि इतर पेयांमध्ये...
या चारही शेतकऱ्यांनी चिया शेती होत असलेल्या मध्यप्रदेशातील निमच येथे भेट दिली. नोव्हेंबर 2022 मध्ये चौघांनीही या पिकाची लागवड केली आहे.
चिया शेती ही अतिशय किफायतशीर आहे. या पिकाला एकरी लागवड आणि संगोपनाचा खर्च हा पाच हजारांपर्यंत आहे. एकरी पाच ते सात क्विंटलचं उत्पन्न यातून मिळत आहे. क्विंटलमागे 15 ते 20 हजार रूपये भाव लक्षात घेता यातून एकरामागे किमान लाखभरापर्यंत नफा अपेक्षित आहे.
या चार मित्रांमधील उदय ठाकरे या शेतकऱ्याने 'चिया' शेती संदर्भात यूट्यूब तसेच गुगलवरुन माहिती गोळा केली. त्याची कल्पना इतर गजानन, रवी आणि ओमप्रकाश यांना दिली.
पारंपारिक शेती आणि पीकपद्धतींच्या मळलेल्या वाटा सोडत नव्या पायवाटा शोधणं गरजेचं आहे. चिया शेती याच नव्या पायवाटेवरील शेतकरी उत्कर्षाचा नवा राजमार्ग ठरु शकतो.