PHOTO : करमाळ्यात लाल आणि इलायची केळीचं उत्पादन, इंजिनिअर तरुणाची यशोगाथा
लाल केळी आणि वेलची केळी या दोन प्रकारात देशातील तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांची मक्तेदारी होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता करमाळा (Karmala) तालुक्यातील एका तरुण इंजिनियरने या दोन्ही प्रकारच्या केळीचे यशस्वी उत्पादन घेत देशभरातील व्यापाऱ्यांना आपल्या बांधावर येण्यास भाग पाडले आहे.
लाल रंगाची केळी ही आयुर्वेदात अतिशय औषधी आणि गुणकारी म्हणून ओळखली जातात. याचमुळे सर्व व्हीव्हीआयपी आणि उच्चभ्रू वर्गात या केळींना फार मोठी मागणी आहे.
अभिजीतने पहिल्यांदा 2015 साली वेलची केळी लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याने 7 एकरवर लागवड केली. गीर गायीचे शेण, गोमूत्र आणि ऊसाच्या मळीची स्लरी देत त्याने याची जोपासना केली.
वेलची केळीमध्ये अनेक प्रथिने असून याचा फायदा अनेक विकारांवर होत असल्याचे मानतात. हिरवी दिसणारी आणि केवळ 2 ते 3 इंच लांबी आणि आकाराने गोलसर असणाऱ्या वेलची केळीचा स्वाद अगदी पेढ्याप्रमाणे असतो.
यानंतर अभिजीतने ही वेलची केळी 30 एकरात केली आणि दर दहा महिन्यांनी दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळू लागले.
2019 मध्ये अभिजीतने शेतात 3 एकरावर पहिल्यांदाच लाल केळीची लागवड केली. सेंद्रिय पद्धतीने जोपासना केल्याने 14 महिन्यात एकरी 18 ते 20 टन एवढा माल मिळाला. या केळींना देखील प्रतिकिलो 50 ते 75 प्रमाणे भाव मिळत असल्याने महाराष्ट्रात केलेला हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले.
या लाल केळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात तर सोडियम कमी प्रमाणात असल्याने हे ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
रोज दोन लाल केळी खाल्ल्याने कॅन्सर, हृदय विकार , मधुमेह, डोळ्यांचे विकार हे आजार दूर ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याचं मानलं जातं.
याशिवाय पचनसंस्था अत्यंत परिणामकारक चालण्याचे कामही या लाल केळ्यांमुळे होते. त्यामुळेच या केळ्यांना उच्चभ्रू वर्गात फार मोठी मागणी आहे.
सध्या अभिजीतचे पाहून वाशिंबे परिसरात 500 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर ही वेलची केळी आणि रेड बनाना लागवड झाली असून आता हे वाशिंबे वेलची केळी आणि रेड बनानाचे हब बनू लागले आहे. विशेष म्हणजे हि केळी पाहण्यासाठी सध्या जळगाव, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील विविध भागातून शेतकरी येतात.