अवकाळी पावसामुळं द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढणार
द्राक्ष पंढरी असणाऱ्या नाशिक जिल्ह्याती शेतकरी अडचणीत आला आहे. कारण सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा परिणाम शेती पिकांवर होत आहे. फळबागांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अवकाळी पावसाचा परिणाम द्राक्षाच्या घडावर होत आहे. त्यामुळं मनी खाली पडत आहेत.
अवकाळी पावसामुळं द्राक्ष बागांवर विविध रोगांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळं शेतकऱ्यांना विविध औषधांची फवारणी करावी लागणार आहे. याचा मोठा खर्च शेतकऱ्यांना येणार आहे.
यावर्षी द्राक्ष उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. कारण कारण विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा परिणाम बागांवर होत असल्यानं फवारणी करणं गरजेचं आहे.
द्राक्ष बागा सध्या फुलोऱ्यात आहेत. अनेक ठिकाणी बागांना चांगला मालही लागला आहे. मात्र, अशातच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाचं संकट आलं आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी पाऊस झाला आणि आज सकाळपासून जिल्ह्यात धुक पसरल्यानं द्राक्ष बागांवर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
द्राक्ष बागांवरील पावसाचे पाणी झटकण्याची धडपड शेतकरी करत आहेत. फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष मण्यावर आणि पानांवर पाणी साचलं असल्यानं डाग पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
औषध फवारणीचा खर्च दुपटीने वाढणार आहे. बागेत पाणी असल्यानं ट्रॅकटरने फवारणी करता येत नाही. त्यामुळं मजूर लावूनच फवारणी करावी लागणार आहे.
द्राक्ष बागांना दवण्या आणि भुरीपासून वाचण्यासाठी हजारो रुपयांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळं बळीराजा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.