Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा अंदाज, 24 जूनपासून पावसाचा जोर वाढणार
राज्यातील वातावरणात सतत बदल (Climete Change) होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही भागात उन्हाचा तडाखा जाणावत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम (Kharip Crop News) अडचणीत आल्याचं चित्र आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे (Maharashtra Rain Update) लावून बसला आहे.
काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे.
जून महिना सुरु होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे.