Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिवाळ्यात 'स्ट्रॉबेरी' पिकातून मिळवा लाखोंचा नफा
थंडीच्या दिवसात तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Farming) करुन चांगले उत्पादन घेऊन शकता. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात 'स्ट्रॉबेरी'ला मोठी मागणी असते. त्यामुळं या काळात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून तुम्ही लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवू शकता.
स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी स्ट्रॉबेरी खाणं फायदेशीर आहे.
आता स्ट्रॉबेरेची शेती फक्त डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही. तर मैदानी भागातही योग्य नियोजन केल्यास स्ट्रॉबेरेची शेती करु शकता.
थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रीक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असतात.
जगात स्ट्रॉबेरीच्या सुमारे 600 जाती आहेत. त्यापैकी कॅमरोसा, चांडलर, ऑफरा, ब्लॅक पीकॉक, स्वीडन चार्ली, एलिस्टा आणि फेअर फॉक्स या जातींच्या स्ट्रॉबेरीची भारतात लागवड केली जाते.
स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी सुरुवातीला शेतात बेड तयार करा. त्यावर मल्चिंग पेपर टाकून ठिबक सिंचनाची व्यवस्था करा. रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करा.
स्ट्रॉबेरीची लागवड फक्त रब्बी हंगामात केली जाते. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी आता उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पिकवली जाते.
स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी आधी मातीची चाचणी घ्या, जेणेकरून माती आणि हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य का? हे समजेल.