Photo : देशात तांदळाची विक्रमी खरेदी
शात तांदळाची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. हरियाणासह तेलंगणा यूपीमध्ये खरेदीत मोठी वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात आत्तापर्यंत तांदळाची विक्रमी खरेदी झाली आहे. आणखी सरकारकडून तांदळाची खरेदी सुरुच आहे
आत्तापर्यंत सरकारनं 306 लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक खरेदी करण्यात आली आहे.
मागील वर्षी याच कालावधीत देशात 280.51 लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी त्यामध्ये वाढ झाली आहे.
देशात सध्या मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. तांदळाची वाहतूक करणारी वाहने विविध राज्यातील खरेदी केंद्र आणि मंडईसमोर उभी आहेत.
देशातील बंपर धान खरेदीमुळे केंद्र सरकार समाधानी आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तांदळाचे पैसे 48 तासात तर 72 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या खरेदी वाढली आहे. सध्या ज्या पद्धतीने तांदळाची खरेदी सुरू आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात त्यात आणखी झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे.
पंजाबमध्ये तांदळाच्या खरेदीत घट झाली. कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तांदूळ खरेदीत 2.76 टक्क्यांची घट झाली आहे.
हरियाणा राज्यात तांदळाच्या खरेदीत 8.18 टक्क्यांची वाढ झाली आहे. हरियणात आत्तापर्यंत 58.96 लाख टन झाली आहे.
तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये तांदळाच्या खरेदीत यावर्षी वाढ झाली आहे. तेलंगणामध्ये आत्तापर्यंत 16.18 लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत 10.28 लाख टन तांदळाची खरेदी झाली आहे.