Photo : कोकणसह नंदूरबार जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात
भात पिकाचे नुकसान झाल्यामुळं, सरकारनं भात उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. भात पिकालाही या पावसाचा फटका बसलाय.
काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीनं भाताची मळणी केली जात आहे. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं भाताची मळणी केली जात आहे.
यावर्षी परतीच्या पावसाचा भात पिकाला फटका बसल्यामुलं उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परतीच्या पावसानं कोकणात देखील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं उत्पादनात घट येणार आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड केली जाते. त्या ठिकाणी भात लागवडीसाठी पोषक वातावरण आहे.
कोकणात सध्या भात काढणीच्या कामांना वेग आला आहे. तसेच नंदूरबार जिल्ह्यात देखील भात कापणीला सुरुवात झाली आहे.
यावर्षी परतीचा पाऊस (Rain) आणि अतिवृष्टीमुळे नंदूराबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं उत्पादनात घट येणार आहे.