Farmer : डाळींबाच्या शेतीतून 20 लाखांचे उत्पन्न; पैठणच्या शेतकऱ्याची कमाल
पारंपारिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगातून यशस्वी प्रयोग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काही प्रयोग करत पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील कृष्णा चावरे या शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंब बाग फुलवून दाखवली आहे. विशेष म्हणजे फक्त बाग फुललीच नाही तर त्यातून लाखोंचा उत्पन्न देखील मिळवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपारंपारिक शेतीला फाटा देऊन काही तरी नवीन प्रयोग करण्याचं कृष्णा चावरे यांनी ठरवलं होते. स्वतः कृषी सेवा केंद्र चालत असल्याने त्यांनी आपल्या सात एकर शेतात डाळीबांची बाग लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2020 मध्ये शेतीविषयी नियोजन करून त्यांनी 2000 हजार झाडं लावली.
या काळात अनेक संकटे आली, पण योग्य नियोजन आणि कृषी सल्ला घेत त्यांनी आपली बाग फुलवली. आता प्रथम वर्षात फळ विक्रीला निघणार असून, त्यांना मोठी आर्थिक उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे
चावरे यांच्या डाळिंब बागेच्या एका कॅरेटला 3100 ते 2100 रुपयांचा भाव मिळाल्याने त्यांनी डाळिंब बागेसाठी केलेली मेहनत फळाला आली आहे.
चावरे यांची कोळीबोडखा शिवारात वडिलोपार्जित जमीन असून, त्यांनी सात एकर क्षेत्रावर डाळिंब बाग लावली आहे. तर उर्वरित क्षेत्रात तूर लागवड केली आहे
डाळिंब बागेतून पहिल्या वर्षीच अडीच लाख खर्च तर पंचवीस लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
चावरे यांच्या डाळिंब नाशिक येथे विक्री केला जातो. सद्या त्यांना यासाठी एका कॅरेटला 3100 ते 2100 रुपयांचा भाव मिळत आहे.
मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली असून, गेल्या तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पैठण तालुक्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला.
कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसाने डाळिंब बागावर मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग, मर रोगाने आक्रमण केले. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली.
पण अशा परिस्थिती देखील पैठणच्या कोळीबोडखा येथील कृष्णा चावरे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंब बाग फुलवून दाखवली.