Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची रक्कम
डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला होता. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP माझाच्या बातमीच्या इम्पॅक्टमुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पिकांना मोठा फटका बसला होता.
अवकाळी पावसामुळं शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला होता. विशेषत: फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता.
अवकाळी पावसामुळं नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका बसला होता. यावेळी फळ उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून पिक विमा काढला होता.
शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पिक विम्याची रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न ABP माझाने लावून धरला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे केळीआणि पपई बागांना मोठा फटका बसला होता. यावेळी शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून पिक विमा काढला होता
नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्याकडे पाठपुरवा केला होता. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न ABP माझाने लावून धरल्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. विमा कंपनीने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे.
विमा कंपनीने 2 कोटी 98 लाखाची मदत देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 43 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळत असल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ABP माझाचे आभार मानले आहेत.