Red Chilli Rate : धर्माबादमध्ये मिरची उत्पादनात वाढ, दराची 'लाली' कायम
यावर्षी मिरचीच्या उत्पादनात (Chilli Production) चांगली वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्पादनात वाढ झाली असली तरी दर कायम असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
मिरचीचे आगार म्हणून प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील नांदेड (Nanded) जिल्ह्यातील धर्माबादमध्ये (Dharmabad) यंदा मिरचीचे पीक चांगले आले आहे.
शेतकरी मिरची बाहरेच्या ठिकाणी पाठवण्यावर भर देत आहेत. मिरचीची आवक वाढली असली तरी दराचा ठसका कायम आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद हे मिरची, हळद आणि धने पावडरच्या बाजारपेठेसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी धर्माबादसह हैदराबाद, खम्मम, वरंगल, ब्याडगी (कर्नाटक) , सोलापूर, गुलबर्गा या ठिकाणांवरून मिरची विक्रीसाठी येते.
ग्राहक देखील मिरची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात. तसेच धर्माबादची गावरानी आणि तेजा या प्रसिध्द मिरच्या असून त्यांना अधिक मागणी असते.
जानेवारी महिन्यापासून लाल मिरची बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी मिरचीचे पीक चांगले आले आहे. धर्माबादमध्ये सध्या 400 ते 500 थैल्या रोज मिरची येत आहे.
मार्चमध्ये आणखी आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच धने एक हजार ते दोन हजार थैल्यांची रोज आवक होत आहे.
तेजा मिरचीला अधिक मागणी असून, या मिरचीपासून तेल तयार करण्यात येते. तेलंगणातील खंम्मम येथे याची फॅक्ट्री आहे.
उत्पादन वाढले तरी, मिरचीचे दर हे मागील वर्षाप्रमाणेच स्थिर आहेत. कमी होण्याची शक्यता कमी आहे.