Kisan Sabha : सरकारनं कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, किसान सभेची मागणी
कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर 450 ते 600 रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) हवालदिल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील भाजप-शिंदे सरकारनं (BJP-Shinde Govt) तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं करण्यात आली आहे.
सरकारने कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन किसान सभा हातात घेईल असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिलाय.
सत्ताधाऱ्यांनी सत्ताखेळ थांबवावा आणि कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे.
सरकारनं शेतकऱ्यांची ही संतापजनक उपेक्षा थांबवावी, कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी अशी मागणी किसन सभेचे नेते अजित नवलेंनी केलीय
राज्यातील प्रमुख कांदा बाजार समित्यांमधील विक्रीदर 450 ते 600 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च 850 ते 900 रुपये प्रति क्विंटल आहे
राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ 450 रुपये ते 600 रुपयांचा दर मिळत असल्याचे अजित नवले म्हणाले.
कांद्याचा उत्पादन खर्च तर सोडाच या दरात काढणी आणि वाहतुकीचा दरही भरून निघत नाही. राज्यातील भाजप-शिंदे सरकारनं या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.
सरकारनं शेतकऱ्यांची ही संतापजनक उपेक्षा थांबवावी आणि कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी अशी मागणी किसन सभा करत आहे.