Red chilli : नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ (chilli Market) म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Market Committee) ओळख आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदुरबार बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी सुरु आहे. यावर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात दोन लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची (Red chilli) खरेदी करण्यात आली आहे.
मार्च महिन्यात नंदुरबार बाजार समितीत 25 हजार क्विंटल मिरचीची आवक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी केली जात आहे.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका मिरची पिकाला बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काही प्रमाणावर मिरचीच्या उत्पन्नात घटही झाली आहे.
वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे
सध्या ओल्या लाल मिरचीला तीन हजार रुपयापासून ते 5 हजार 500 रुपयापर्यंतचा दर दिला जात आहे.
कोरड्या लाल मिरचीला आठ हजार ते 15 हजार रुपयांचा दर मिळत आहे. मिरचीचा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला आहे
यावर्षी मिरचीचे उत्पन्न चांगलं झालं होतं. त्यामुळं पुढील हंगामात देखील मिरचीची लागवड चांगल्या प्रमाणावर होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आली आहे.
नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी केली जात आहे. आत्तापर्यंत मिरची खरेदीचा दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.