Palghar : पालघर जिल्ह्यात मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात
सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या बदलांचा परिणाम शेती पिकावर (Agriculture Crop) होताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी थंडी तर कधी उन्हाचा चटका बसत आहे. या लहरी वातावरणामुळं पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू , पालघर आणि तलासरी तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
अनेक ठिकाणी मिरची पिकावर (Chilli Crop) विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं उत्पादनात घट येणार आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय.
पालघर जिल्ह्यातील डहाणू , पालघर आणि तलासरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतलं जातं. सध्या मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
लहरी वातावरणामुळं मिरची उत्पादनावर परिणाम होत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 हजार हेक्टरवर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात येते.
तिखट मिरचीसह, आचारी मिरची, भोपळी मिरचीचे उत्पादन घेतलं जाते. शेतकरी हे सध्या मिरचीच्या झाडावर येणाऱ्या थ्रिप्स, माइट्स, व्हाईट फ्लाय किडीच्या प्रादुर्भावामुळं जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.
गेल्या दोन वर्षापासून मिरची पिकावर थ्रिप्स नावाची किड येत आहे. त्यामुळं मिरची पीक संकटात सापडलं आहे. किडी फुलामध्ये लपून राहत असल्यामुळं त्यावर नियंत्रण मिळवणं अवघड जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
या किडीमुळं पिकाचा दर्जा खालावतो, उत्पादनात मोठी घट येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगतिले. या किडीमुळं शेतकरी संकटात आहे.
एकरी मिरचीसाठी दोन लाख रुपयांचा खर्च आहे. यातून हे खर्चाचे पैसे मिळतील की नाहीत अशी स्थिती असल्याचे शेतकरी म्हणाले.