Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा फटका! पपई, केळी जमीनदोस्त; जनावऱ्याचे चाऱ्यासाठीही हाल
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीसाठी आलेली पपई, केळी जमीनदोस्त झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवकाळी पावसाने कहर केला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे. शेतीचे नुकसान प्रचंड असून प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू झाले आहेत.
पण, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानाच्या क्षेत्र वाढतच आहे, परिणामी पंचनामे होण्यास विलंब होत आहे. तर, दुसरीकडे सरकारने पंचनामे यांचा फास न ठेवता सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे.
काढणीसाठी आलेली पपई, केळी जमीनदोस्त झाली आहेत. तर, कापूस, मिरची, कापणी केलेला भात आणि गुरांसाठी असलेला चारा सारकही अवकाळीमुळे हातातून गेलं आहे.
प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहेत. पण, सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान असलं तरी पंचनामे करून काय उपयोग असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.
पंचनामे केल्यानंतर वेळेवर मदत मिळणार नाही, असं म्हणत शेतकऱ्यांनी सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
दुष्काळ जाहीर होऊनही विम्याची अग्रीम मिळत नाही तर, अवकाळीची नुकसानभरपाई कधी मिळेल, त्यामुळे सरकारने सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपई बागायतदार रडकुंडीला आले आहेत.
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे उभी पिकं झोपून गेली आहेत.