Mushroom : कमी जागेत आणि कमी खर्चात 'अशी' करा मशरूमची शेती; 'या' गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्हाला मशरूमची लागवड करून नफा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बाजारात याला खूप मागणी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जर तुम्हाला बटाटे, टोमॅटो, कांदे यापेक्षा काहीतरी वेगळी शेती करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मशरूमची लागवड करून चांगला नफा कसा मिळवता येऊ शकतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मशरूम अतिशय पौष्टिक आणि चवदार आहे. जगभरातील लोकांना ते आवडते. मशरूम लागवडीसाठी जास्त जागा लागत नाही. कमी जागेत आणि कमी खर्चात तुम्ही ते वाढवू शकता. बाजारात मशरूमची मागणीसुद्धा जास्त आहे.
मशरूम लागवडीसाठी कमी देखभालीची आवश्यकता असते. मशरूमचे बी लावल्यानंतर त्याला रोज पाणी देणे आणि तापमान पातळी नियंत्रित करणे देखील महत्त्वाचे आहे.
शेतकरी मशरूमच्या अनेक जाती वाढवू शकतात. यामध्ये व्हाईट बटन मशरूम, मिल्की मशरूम, शिताके मशरूम आणि ट्रफल यांचा समावेश आहे.
मशरूमची लागवड करण्यासाठी, थंड राहतील अशी जागा शोधा. मशरूम लागवडीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरणे महत्त्वाचे आहे.
मशरूमची लागवड करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कमी खर्चात आणि कमी देखभालीमध्ये चांगला नफा मिळवायचा असेल तर मशरूमची लागवड हा एक चांगला पर्याय आहे.