Mushroom : परभणीच्या दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग
परभणी (Parbhani) जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या तीन तरुण शेतकऱ्यांनी मशरुम उत्पादनाचा (Mushroom farming) यशस्वी प्रयोग केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता या तरुणांनी मशरूम उत्पादनातून आर्थिक प्रगती साधली आहे. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (Murumba) गावात मशरुम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
योगेश झाडे बीएस्सी अॅग्री, मंगेश चोपडे आणि दिलीप देशमुख अशी या तीन उच्चशिक्षित तरुणांची नावे आहेत.
पारंपारिक पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं या तीन तरुणांनी एकत्र येत दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधलीय. थंड प्रदेशात येणारे मशरूम दुष्काळी पट्ट्यात आले आहे.
परभणीच्या मुरुंबा गावातील तरुण योगेश झाडेने बीएस्सी अॅग्री तर मंगेश चोपडे आणि दिलीप देशमुख या दोघांनी कॉमर्सच्या पदव्या घेतल्या आहेत.
वडिलांच्या गावात असणाऱ्या शेतीत कायम पारंपरिक पीक घेऊन वर्षाकाठी हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळं शेतीत नवीन काही तरी करायचे या तिघांनी ठरवले. त्यानंतर तिघांनी मशरुम घेण्याचा निर्णय केला.
केवळ दोन गुंठ्यात त्यांनी तुराट्या आणि ज्वारीच्या कडब्याचे शेड उभारले. त्याला आतून आणि बाहेरून ग्रीन मॅट लावली. शिवाय आतून बारदाण्याचे अच्छादनही दिले. बाबूंचे टेबल तयार केले असा हा कमी खर्चात त्यांनी मशरुम उत्पादन करण्यासाठी आसपास उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून शेड उभारले.
25 दिवसानंतर मशरूम यायला सुरुवात होते. मशरूम पीक हे साधारण 45 दिवसाचं असते.
मशरुम हे 45 दिवसांचे पीक आहे. 45 दिवसांच्या कालावधीमध्ये तीन वेळा याची काढणी करता येते. ज्यात पहिल्यांदा 25 व्या दिवशी त्यानंतर 35 व्या आणि शेवटची काढणी ही 45 व्या दिवशी घेतली जाते.