Agriculture News : वर्ध्यात शेतकऱ्यानं पिकवला काळा गहू
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न (Black Wheat Production) घेतले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भात या गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जात असले तरी या गव्हाचे फायदे खूप जास्त असल्यानं नागरिक बाहेरुन हा गहू विकत आणतात.
राजेश डफर यांनी एक एकर शेतात 18 क्विंटल इतक्या काळ्या गव्हाचं उत्पादन घेतलं आहे.
काळा गहू आपल्या शरीरासाठी चांगला असल्याचे राजेश डफर यांनी गुगलवर वाचले होते. या गव्हाचे फायदे मोठ्या प्रमाणात असल्यानं त्याची लागवड करण्याची त्यांना मानसिकता तयार केली आहे.
काळ्या गव्हाचे बियाणे कुठे मिळतात याचा त्यांनी शोध सुरु केला. या काळ्या गव्हाच्या पोळ्या खाल्ल्यानं पोटाचे विकार होत नाहीत.
बऱ्याच ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्यांना आकोट इथे काळ्या गव्हाचे बियाणे मिळाले. त्यांनी सुरुवातीला 40 किलो बियाणे आणून त्याची एक एकर शेतीमध्ये पेरणी केली.
एक एकरात त्यांना 18 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन झाले. सध्या बाजारात काळ्या गव्हाला किलोला 70 रुपयांचा दर मिळत आहे.
काळा गहू हा बहुगुणी आहे. त्याचे औषधी गुणधर्म आहेत. कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थूलता अशा अनेक व्याधींमध्ये गहू उपयुक्त आहे.
काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमिनो अॅसिड असतात.
अॅन्थोसायनीन हे अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढवते. ब्लूबेरी, जांभूळ या फळांमध्ये अॅन्थोसायनीनचे प्रमाण खूप जास्त असते.