Success Story: पालघरमधील इंजिनिअर तरूणाने केली ऑर्किडची शेती, महिन्याला कमावतोय लाखोंचे उत्पन्न
पालघर जिल्हा हा विविधतेने नटलेला असून या जिल्ह्यात विविध पद्धतीने शेती केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भात शेती केली जात असली तरी सुद्धा येथील तरुण सध्या पर्यायी शेतीकडे वळू लागला आहे.
डहाणू तालुक्यातील केतखाडी येथील एका ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑर्किड या फुलाची फुलशेती करत अनोखा उपक्रम केला आहे.
सध्या या ऑर्किड (Orchid) फुलशेती पासून प्रसाद सावे यांना उत्तम उत्पन्नही मिळतंय .
डहाणू तालुक्यातील केतखाडी येथील प्रसाद सावे यांनी शिक्षण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पूर्ण झाले.
मात्र उच्चशिक्षित असताना सुद्धा प्रसाद सावे यांनी आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवून फुल शेती करण्याचा निर्णय घेतला.
ऑर्किड या फुलाची लागवड पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोणीही केली नसून यात उत्तम नफा असल्याने प्रसादने ऑर्किड फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्यांनी गोवा , दिल्ली, कलकत्ता या ठिकाणी जाऊन ऑर्किड फुलशेतीची पाहणी देखील केली.
जिल्ह्यात कुठेही ऑर्किड फुलशेती केली गेली नसल्याने यात जोखीम असल्याच लक्षात येऊन ही प्रसादने आपल्या साडेतीन एकर जागेत शेडनेट उभारून ऑर्किड फुलाच्या रोपांची लागवड केली.
यासाठी प्रसाद यांनी बँकॉक येथून ऑर्किड या रोपांची आयात केली. 2019 सालापासून प्रसाद यांनी या रोपांची लागवड केली असून त्यांना सध्या या ऑर्किड फुलशेतीतून उत्तम नफा मिळतोय.