Farmer Success Stories : पैठणच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल, पाहा फोटो
कृष्णा आगळे असे या तरुण शेतकऱ्याचं नाव असून, पैठणच्या तालुक्यातील हर्षी गावातील हा शेतकरी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृष्णा आगळे यांचे बी.ए शिक्षण झाले आहे. तर त्यांचा पत्नी जयश्री आगळे यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना दहा एकर शेती आहे.
गत दोन-तीन वर्षांपासून पावसाचे पाणी अनियमितता त्यामुळे खर्च जास्त उत्पन्न कमी होत होते. त्यामुळे काही तरी नवीन प्रयोग करून शेती करावी, असा आगळे यांनी विचार केला.
यासाठी त्यांनी शिमला मिरची लावण्याचा निर्णय घेतला. शिमला मिरची लावण्यासाठी कृष्णा यांनी कृषी विभागातून 40 गुंठे जमिनीवर ग्रीन शेडनेट हाऊस उभे केले.या शेड हाऊसमध्ये 8 हजार रोपे आणून लावली.
गेल्या महिन्याभरापासून या शिमला मिरचीचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली अन् महिन्याकाठी एक लाख रुपये मिळाले आहेत.
हा माल सुरत, पुणे, परभणी, नांदेड, हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. आगामी काळात 18 ते 20 टन शिमला मिरचीचे उत्पादन त्यांना अजून अपेक्षित आहे.
सध्या तीस रुपये किलोपर्यंतचा दर मिळाल्याने शिमला मिरचीचे दीड लाख रुपयेपेक्षा अधिकचे उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे.
हा दर कायम राहिला किंवा त्यापेक्षा दर काही प्रमाणात कमीही झाला तरी एक एकर क्षेत्रातून सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न प्रयोगशील शेतीमुळे मिळणार आहे.
कृष्णा हे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असताना शिमला मिरचीचं प्रयोग यशस्वी ठरला असून, यात आई-वडील यांच्यासह पत्नीची मदत मिळाली असल्याचा कृष्णा म्हणाले.