तळकोकणातील भात आणि नाचणी शेती लहरी पावसामुळे अडचणीत, शेतकरी हतबल
पावसाळ्यात कोकणातील प्रमुख पीक म्हणजे भात शेती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र हीच भातशेती पाऊस नसल्याने अडचणीत सापडली आहे.
पावसाचा अनियमितपणा भात शेतीसाठी मारत ठरला असून पावसाविना भातशेती कोमेजून गेली आहे.
तर भात पिकांची उंची देखील खुंटली आहे.
हिरवंगार दिसणारं शेत आता पिवळसर आणि करपून गेल्यासारखं दिसत आल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
वातावरणातील बदलामुळे लहरी पावसाने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.
कारण ऑगस्टच्या महिन्याभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यावर्षी फक्त 220 मी.मी पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी जून महिना पावसाअभावी कोरडा गेला, त्यामुळे शेती उशिराने सुरु झाली.
त्यातही कोकणातील शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने भातशेती केली.
पावसाअभावी भातशेती कोमेजून गेली, काही ठिकाणी तर कातळ भागात आणि भरडी भागात रोपे सुकून गेली आहेत.
भाताची वाढ खुंटली तर भात शेती पिवळंसर झाली आहे.
खरंतर भात शेती फुलोऱ्यावर येणे अपेक्षित असताना पीक कोमेजून गेली.
त्यामुळे भाताचं उत्पन्न मिळेल की नाही याची देखील भीती शेतकऱ्याना सतावत आहे.