Solapur : पाऊस नसल्यामुळं नर्सरी चालकांचं मोठं नुकसान
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नर्सरी (Nursery) चालकांचे मोठं नुकसान नुकसान होताना पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोपवाटिका जगवण्यासाठी काही टँकरने देखील पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या सर्वातून नर्सरी चालकांचा खर्तचही निघणं कठीण झालं आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होत आहे.
. बार्शी तालुक्यातील वाणेवाडी येथील सचिन लोखंडे यांनी पाच वर्षांपूर्वी रोपवाटिका सुरु केली. यंदाच्या वर्षी या रोपवाटिकेत जवळपास 70 ते 80 हजार रोपं होती. मात्र, पाऊस नसल्यानं आता केवळ 10 ते 20 हजार रोपं शिल्लक राहिली आहेत.
पावसानं पाठ फिरविल्यानं आंबा, सीताफळ, जांभूळ, लिंबू, पेरु अशी अनेक रोप अक्षरशः उध्वस्त झाली आहेत.
दरवर्षी वर्षी 20 ते 25 लाखांचे उत्पन्न या रोपवाटिकेतून मिळतं होतं. यंदाच्या वर्षी मात्र रोपांचा खर्चही निघणे अवघड झाल्याची माहिती रोपवाटिकेचे मालक सचिन लोखंने यांनी दिली.
सचिन लोखंने यांनी दिलेल्या माहितीनुसार रोपवाटिका जगवण्यासाठी काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला. मात्र, आता तो खर्च देखील निघणे अवघड झालं आहे.
विहिरींनी तळ गाठला आहे. बोअर आटले आहेत. त्यामुळं रोपवाटिका जगवणं अवघड झालं असल्याची माहिती सचिन लोखंने यांनी दिली.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नर्सरी (Nursery) चालकांचे मोठं नुकसान नुकसान होताना पाहायला मिळत आहे.