Agriculture news : डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची राख रांगोळी
दिवसेंदिवस मराठवाड्यातील (Marathwada) परिस्थिती तर अतिशय विदारक होत चालली आहे.पावसानं ओढ दिल्यानं डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची डोळ्यादेखत राख रांगोळी होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची (Farmers) खरीपातील पिकं वाया जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati sambhaji nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही भीषण परिस्थिती झाली आहे.
पावासानं गेल्या अनेक दिवसापासून ओढ दिली आहे. पावसानं ओढ दिल्यानं डोळ्यादेखत हिरव्यागार पिकांची राख रांगोळी होत आहे.
मराठवाड्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण पाण्याअभावी शेतकऱ्यांची उभी पिकं जळू लागली आहेत.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati sambhaji nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही भीषण परिस्थिती झाली आहे.
शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. नजर पोहोचेल तिथपर्यंत पिक वाळली आहेत. मेहनत करुन पेरलेली पिकं वाया जात असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीत मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे.
गेल्या 20 ते 25 दिवसापासून पाऊस नसल्यानं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.