Photo : दुग्ध व्यवसायासाठी आता मिळणार 50 टक्के अनुदान
दुग्ध व्यवसायासाठी केंद्र सरकार आता 50 टक्के अनुदान देणार आहे. या माध्यमातून दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याबाबतची माहिती मंत्री डॉ. संजीव बल्यान यांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना (Farmers) दुग्ध व्यवसाय करण्यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा तरुण शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
दुग्ध व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनुदान दिल्यामुळं तरुणांना व्यवसाय करणं शक्य होणार आहे.
सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन देशातील तरुण शेतकरी स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील, अशी माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बल्यान यांनी दिली आहे.
सरकार गाय, म्हैस, कोंबडी, शेळी आणि डुक्कर पालनाचा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात 50 लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देण्याचा सरकार प्रयत्न असल्याचे मत डॉ. संजीव बालियान यांनी सांगितले.
राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेंतर्गत देशी गायींच्या संगोपनाला चालना दिली जात आहे. या योजनेंतर्गत, सरकारने आता प्राण्यांच्या उपचारासाठी 4 हजार 332 हून अधिक पशुवैद्यकीय युनिट (Veterinary Unit) उघडण्याची व्यवस्था केली आहे.
शेतकरी किंवा कोणताही व्यावसायिक आता मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.
सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढत आहे. त्यामुळं या व्यवसायूतन मोठ्या प्रमाणावर नफा मिळवणं शक्य आहे.
व्यवसायातून अधिकाधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अनेक योजनांवर काम करत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायासाठी आता 50 टक्के अनुदानही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात 50 लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देण्याचा सरकार प्रयत्न असल्याचे मत डॉ. संजीव बालियान यांनी सांगितले.