नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव
वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. या बदलाचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होताना दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदूरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा मिरची पिकाला फटका बसत आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट आली आहे.
ढगाळ वातावरणामुळं मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक भुरी रोगाचाच प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळं यावर्षी मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी मिरचीचं उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही यातून निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
बदलत्या वातावरणामुळं नंदूरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावलेत. कारण ढगाळ वातावरणामुळं मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा परिणाम उत्पादनात घट येत आहे.
दुसरीकडं मिरचीला बाजार भाव चांगला मिळत असला तरी उत्पादन घटल्यानं दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.
यावर्षी मिरची उत्पादन घटल्यानं सर्वसामान्यांच्या जेवणातील चटणीचे दरही वाढणार आहेत. एकूणच मिरचीवर आलेल्या रोगांच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी टाकलेले भांडवल निघण्याची शक्यता नसल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
नंदूरबार जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा मिरची पिकाला फटका बसत आहे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट आली आहे.