शेतकऱ्यांसमोर असणारी 10 संकटे कोणती?
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खते, बियाणे याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामानाने शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनैसर्गिक संकटाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस तर कधी चक्रीवादळ अशी संकट येत आहेत. या संकटामुळं शेतकरी उद्धवस्थ होताना दिसत आहे.
राजकीय लोकांचा शेती क्षेत्राला किंवा शेतकऱ्यांना असणारा पाठिंबा कमी होताना दिसतोय. त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. शेतकऱ्यांच्या हिताची धोरण राबवली जात नसल्याचा फटाका शेतकऱ्यांना बसत आहे. त्याचा देखील शेतीवर परिणाम होताना दिसत असल्याचे डॉ. अजित नवले म्हणाले.
शेतीचं होणार कॉर्पोरेटीकरणं हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे मत डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो दर मिळत नसल्यानं शेती संकटात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाला आधारभावाचे संरक्षण देण्यात यावं. त्यामुळं शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही
सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा हे देखील शेतीसमोरील संकट आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या योग्य त्या सुविधा नसल्यानं शेतीला फटका बसत आहे. ज्यावेळेस पिकांना पाण्याची गरज असते तेव्हाच पाणी मिळत नाही.
शेतीसाठी योग्य प्रकारचा वीजपुरवठा होणं गरजेचं आहे. पण सध्या अनेक ठिकाणी कमी दाबानं योग्य प्रकारे वीजपुरवठा होत नाही. त्याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.
तापमान वाढ हे सुद्धा शेतीसमोरील मोठं संकट आहे. याचाही शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. हावामानातील बदलामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे.
100 टक्के पिकांना हमीभाव मिळावा. सध्या देशात 4 ते 5 टक्के पिकांना हमीभाव असतो. मात्र, इतर पिकांना हमीभाव मिळत नसल्यानं शेती तोट्यात जात असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
रस्ता, पाणी आणि वीज या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. हे मूलभूत प्रश्न सुटणे गरजेचे आहे. हे तिन्ही घटक शेतीसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.