नंदूरबारमध्ये सीसीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात
नंदूरबारमध्ये सीसीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षीत असणारा दर मिळत नाही. वाढीवर दर देण्याची शेतकरी मागणी करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदूरबारमध्ये (Nandurbar) भारतीय कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली आहे. सध्या कापसाला (Cotton) 8 हजार 400 रुपयांचा दर मिळत आहे
कापसाला वाढीवर दर मिळावा अशी शेतकऱ्यांची (Farmers) मागणी आहे. अशात खासगी व्यापारी कापसाचे दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी यार्डमध्ये सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी कापसाला 8 हजार 400 रुपयांचा दर मिळत आहे.
पहिल्याच दिवशी कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. सीसीसीआयचे कापूस खरेदी सुरू झाल्याने खासगी व्यापारी कापसाचे दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सीसीआय बाजार मूल्यानुसार दर देत असून खासगी व्यापाऱ्यांपेक्षा सीसीआयचे दर जास्त असल्यानं शेतकऱ्यांचा चांगल्या प्रतिसाद मिळेल असे चित्र आहे.
सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्यानं पहिल्याच दिवशी 130 वाहनातून कापूस विक्रीसाठी दाखल झाला होता. शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसात धनादेशाचा स्वरूपात सीसीआयतर्फे पैसे दिले जाणार
अधिकाधिक शेतकऱ्यांनी सीसीसीआयला कापूस विक्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे. खरेदी केंद्र सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा आहे
भाव कमी असल्यानं जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत केवळ पंधरा ते वीस टक्के कापूसच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर आणला आहे. दर कमी असल्यामुळं शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.