नंदूरबार बाजार समितीत मिरचीची आवक घटली
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिरचीवर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भाव आणि अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे
नंदूरबार बाजार समितीत मिरचीची आवक कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून मिरचीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 50 हजार क्विंटल मिरचीची विक्री झाली आहे. मिरचीवर अनेक प्रकारचे रोग आल्यामुळं मिरची पिकात मोठ्या प्रमाणावर घट आल्याचे दिसून येत आहे.
मिरचीचा हंगाम जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र, एकीकडं मिरची उत्पादनात घट येत आहे.
नंदूरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीला तीन हजार रुपयापासून पासून ते सहा हजार 500 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. तर सुक्या लाल मिरचीला आठ हजार ते 16 हजार रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे.
मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
नंदूरबारसह भंडारा जिल्ह्यातही मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
मिरचीचा हंगाम जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र, एकीकडं मिरची उत्पादनात घट येत आहे.