दूध दराच्या प्रश्नावरुन किसान सभा आक्रमक
राज्यातील दूध उत्पादक शेतकरी (Milk Farmers) सध्या अडचणीत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुधाच्या दरात (Mlik Price) मोठी घसरण झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांसह राज्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.
दुधाला किमान 34 रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी आज (5 डिसेंबर) किसान सभा (Kisan Sabha) आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून तीव्र आंदोलन केले
सरकारनं जर दखल घेतली नाहीतर तर मंत्रालयात दूध ओतावं लागेल असा इशाराही यावेळी किसान सभेनं दिला.
दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा या मागणीसाठी किसान सभा आणि दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर दुध ओतून तीव्र आंदोलन केले.
राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे आणि पशुखाद्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुधाला किमान 34 रुपये भाव द्यावा असा शासनादेश काढला. मात्र सरकारचा हा शासनादेश खासगी आणि सहकारी दूध संघांनी धुडकावून लावला आहे.
सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
मिल्को मिटर आणि वजन काट्यांची नियमित तपासणी करावी