दुधाच्या दरात घसरण किसान सभेचा सरकारला इशारा
सध्या राज्यातील दूध उत्पादक शेतकरी (Milk Farmers) संकटात आहे. कारण दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App34 ते 35 रुपये लिटरने जाणारे दूध सध्या 27 रुपये लिटरने जात आहे. याच मुद्यावरुन किसान सभा आक्रमक झाली आहे.
राज्यात सणासुदीच्या काळात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई निर्मितीसाठी दुधाची मागणी वाढलेली असताना, दुष्काळ असल्याने दुधाचे उत्पादन घटले असताना मागणी वाढली आहे. मात्र, मागणी वाढूनही दुधाचे दर कमी कसे?
दुध दर प्रश्नी दुग्ध विकास विभागानं हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेनं दिला आहे.
राज्यात दुध संघ आणि कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दुधाला 34 रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दरात रिव्हर्स दराची मेख मारुन दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले.
34 रुपयांऐवजी बेस रेट 27 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले.
राज्यात सणासुदीच्या काळात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई निर्मितीसाठी दुधाची मागणी वाढली आहे. दुष्काळ असल्यानं दुधाचे उत्पादन घटले आहे. अशा स्थितीत मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दूध दर वाढायला पाहिजे होते. मात्र, याउलट मागणी कमी आणि उत्पादन अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
दुध भेसळ, वजनकाटे आणि मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी दुग्ध विकास विभागाकडं द्यावी