Jalgaon News : पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पपईला विक्रमी उच्चांकी भाव
एकीकडे कांदा, टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मात्र केळी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी पातळीवर भाव मिळत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विक्रमी भावाचा फायदा जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील करंज गावातील शेतकरी प्रदीप जगन्नाथ पाटील यांना झाला आहे.
केवळ एक एकर क्षेत्रात पपई उत्पादनातून त्यांनी चार तोड्यात खर्च वजा जाता सव्वातीन लाख रुपयांची कमाई केली आ
येत्या काळात त्यांना तेवढेच उत्पन्न येणार असल्याने पपई (Papaya Price) लागवडीतून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप जगन्नाथ पाटील या शेतकऱ्याकडे तीन एकर शेती आहे.
यामध्ये एका एकरमध्ये त्यांनी मागील वर्षी मेअखेरीस वी एन आर 15 जातीची पपई रोपांची लागवड केली होती.
या प्रकारच्या जातीत व्हायरस येण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यामुळे वी एन आर पंधरा जातीची लागवड त्यांनी केली असल्याचं सांगितलं.
पपई रोपांची लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची चांगली खोलवर नांगरणी करुन आणि रोटावेटर करुन जमिनीची मशागत केली होती.
यानंतर दहा बाय सहा या अंतरावर रोपांची लागवड करताना सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा बेसल डोस दिला होता.
पपईवर अळीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बुरशी नाशकसह कीडनाशकाची फवारणी केली होती.