Hapus : यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी, वाढत्या उष्णतेसह थ्रिप्सचा मोठा फटका
गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी झालं आहे. कारण वाढत्या उष्णतेसह थ्रिप्सचा प्रादुर्भाव आंबा पिकावर झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील हापूसला (Hapus) जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट (Mango production) झाली आहे.
मागील 20 वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याच उत्पादन कमी झालं आहे. बदलतं वातावरण (Climate Change) आणि पिकावर पडणारा रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे.
सध्या वातावरणात सातत्यानं चढ उतार होत आहे. पहाटे थंडीचा कडाका आहे तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसत आहे.
वाढत्या उष्णतेचा मोठा फटका हापूस आंब्याला बसत आहे. त्यामुळं आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढं नवं संकट उभं राहिलयं.
आंब्यावर थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव देखील देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या प्रमाणात औषध फवारण्या करुन देखील थ्रिप्सचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे.
बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. यामुळं जगप्रसिद्ध कोकणच्या हापूसचे पहिल्या टप्प्यातील पीक धोक्यात आले आहे.
बदलत्या वातावरणामुळं आंब्याला कमी बहर आल्यानं 15 एप्रिल ते 15 मे यादरम्यान हापूसचा तुटवडा भासणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.
यावर्षी हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे.
सन बर्न झालेले हे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. कोकण किनारपट्टी भागातील आंबा बागायदारांना याचा सर्वाधिक फटका बसला होता.
हापूस आंब्याचं एकूण उत्पन्न 20 टक्केच येणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.